Sunday, February 6, 2011

पूल

दृश्य १

मोठया शहरातील प्रथितयश कॉलेजचं कॅम्पस, मध्यम-उच्चमध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा गट. गप्पा धमाल चालू आहे.
"Guys listen, let's bunk the lecture."
"हो रे, चला MacD त चक्कर टाकू."
"अगं मलाही shopping करायचंय, high heels, accessories. I want to recharge also. काय पटकन balance संपतो गं. काल खूपच calls, sms झाले. Mom ने कृपा करून 2000/- दिलेत.
"काय रे FB वर नव्हतास काल? it's more than 24 hours now, no status update?"
"अरे यार, Dad ने recharge केलंच नाही. आठवण केली तर, फार वेळ घालवतोस त्याच्यात म्हणून बोलणी खाल्ली. आता रोज ४-५ तास net surfing म्हणजे काय जास्त आहे का? but these people ना?”

दृश्य २
कल्याण स्टेशन परिसर. चहाची टपरी, एक छोटया चहा द्यायला धावपळ करतोय. अर्ध्या तासात सहा-सात तरी चकरा मारल्या त्याने, जड गरम किटली आणि ग्लास घेऊन. किती वय असेल त्याचं? १०-११ एखादं वर्षं जास्त. मधेच चहा ओतताना हातावर सांडला, भाजल्याने चेहरा कळवळलेला, मात्र हातावर पाणी ओतून पुन्हा धावपळीला तयार.

दृश्य ३
मुंबई-वाराणसी ट्रेन. गाडीत कचरा साफ करायला आलेली मुलं, १०-१२ वर्षाचा मुलगा - ६-७ वर्षाची त्याची धाकटी बहिण. कष्ट नि गरीबीमुळे हडहडलेली, पोटं खपाटीला गेलेली. काय भोगलं असेल त्या जीवांनी. कुठे बघावं ते कळेना इतकी शरम मनात दाटून आली.

दृश्य ४
मध्य प्रदेशातील मागास भागातील दुर्गम गाव. गावातल्या महिलांबरोबर मीटिंग सुरू आहे. काही जणी लांब घूंघट घेतलेल्या. गप्पांमुळे वातावरण सैल झाल्याने घूंघट बाजूला होऊन दिसू लागले, त्याआडचे कोवळे चेहरे, १३-१४ वर्षाच्या मुली. कालपरवा पर्यंत शाळेत जात असतील. थोडया वेळाने 'कामाची वेळ' झाल्याने त्या छोट्या मुली उठून गेल्या.

दृश्य ५
विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हा. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं कुटुंब. मुलगा १८-१९ वर्षाचा, त्याची आई असेल फार तर चाळीशीची. मुलाने यातून कष्ट करून वर येण्याची जिद्द धरलेय. हरेक प्रयत्न तो करतोय. बाहेरून पदवीची परीक्षा देतोय.

दृश्य ६
माझ्या नवऱ्याने त्याच्या कामासंदर्भात सांगितलेला प्रसंग.
पुण्याच्या उपनगरातलं B.Ed कॉलेज. अल्प उत्पन्न गटातल्या अनेक तरुण मुली, अनेकजणी दिवसा कॉलेज करून संध्याकाळी/रात्री अर्ध/पूर्ण वेळ काम करणाऱ्या. आरोग्य प्रशिक्षण सुरू होतं. एक मुलगी मोबाईलवर काही करत होती. sms, games वगैरे चालू असेल असं वाटलं पण मग लक्षात आलं की ती lecture record करतेय. त्याबद्दल विचारलं असता तिनी जे सांगितलं ते ऐकून तिचं कौतुक वाटलं. तिच्या घरची परिस्थिती फार बरी नाही पण त्यातल्या त्यात बचत करून तिनी हव्या त्या सुविधा असलेला handset घेतला. lecture सुरू असताना नोट्स घेताना महत्वाचे मुद्दे निसटतात त्यामुळे ते record करून मग ती नीट लिहून काढते. तिच्या आईची इच्छा असूनही आईला शिकता आलं नाही. मग हे सारं ती आईलाही दाखवते. sms/chat/games/surfing साठी mobile phone चा वापर करणाऱ्यांच्या तुलनेत तिचा विचार मोठा होता, तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचा होता.

आपल्या समाजातल्या विविध स्तरांतल्या माणसांच्या आयुष्याच्या ह्या झलकी. काही जणांना आयुष्य मजेत काढण्याचं भाग्य तर अनेकांच्या पुढे गरिबी, कष्ट, शोषण, वंचितता वाढून ठेवलेली. काहींना बऱ्याच अंशी हक्क्प्राप्ती तर काहींची आयुष्यं कामालाच बांधलेली.
सुस्थापित घरातली तरुणाई आपल्याच समाजातल्या वंचितांकडे संवेदनशीलतेने पाहील का?
कसे बनतील पूल; एकाच समाजातल्या भिन्न जगांना साधणारे?

4 comments:

 1. मोबाईलवर notes घेणा-या त्या मुलीच कौतुक वाटल. पण जी गोष्ट 'क्ष' शक्ती वापरून करायची त्यासाठी तिची '३ क्ष' शक्ती वाया जातेय. शिवाय battery charging च व्यवधान आणि खर्च वेगळाच! कुणीतरी तिला चांगल्या notes कशा घ्यायच्या असतात हे शिकवलं तर ती अधिक चांगल शिकू शकेल.

  ReplyDelete
 2. kharay eakdam kharay,..............aaj aapalya societymadhe khup tafawat aahe ....pan ya sagalyamadhe aapan swastha kay karu shakato?...........te aapan aapalya level nakki karu .... aapalya mullanna wadhawatana tari tyanna hi janiv tyanna karun dewu.........at.....

  ReplyDelete
 3. ek lakshat aala saglejan aapaaplya parine jagat asto... aata mcdt jaun enjoy kela tari futuremadhye struggle karavach lagnaar asta... n recording lecture mean she enjoying comfort in her way.. amhipan dictation record karto baryachda:)

  ReplyDelete
 4. आतिवास, हो खरं आहे पण किमान तंत्रज्ञानाचा उपयोग ती विधायक कामात करतेय हे विशेष.

  आश्लेषा: खरं आहे, प्रयत्न करत रहायचं.

  मनीषा: संघर्ष सर्वांनाच आहे मात्र समाजातील आपल्या स्थानानुसार त्याची धार कमी जास्त होते.

  ReplyDelete