Saturday, December 31, 2011

प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा आणि प्लॅटफॉर्म नं. झीरो


हॉगवर्टझ शाळेत जाण्यासाठी किंग्स क्रॉस स्टेशनवरची लगबगनवीन विद्यार्थ्यांची पावणेदहा नंबरचा प्लॅटफॉर्म शोधण्यासाठीची गडबडत्या प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर टाकलेले सुटकेचे नि:श्वासकोणाचे अवजड समानकुणाचं घुबडकुणाचा बेडूककोणाचा उंदीर तर कुणाचा बोका. आईबाबांच्या असंख्य सूचना अर्थातच हॅरी सोडून. हॉगवर्टझच्या जादुई दुनियेकडे जायला सुरुवात होते ती प्लॅटफॉर्म नं. पावणेदहापासून. केशरी रंगाचीझुकझुक गाडीसारखी धुराचे शुभ्र ढग सोडणारी हॉगवर्टझ एक्सप्रेस. सगळा माहोल उत्साहउत्कंठा नि थोड्या भीतीचाही. 

सर्वसामान्य घरातल्या लहान मुलांसाठी आगगाडी म्हणजे भावविश्वाचा एक विशेष हिस्सा असतो. हेच नेमकं हेरून जे. के. रोलिंगने ही सुंदर कल्पना केली असणार. आपल्याकडेही मामाच्या गावाला जाणारी झुकझुक गाडी तर गाण्याच्या रुपात अमर झाली आहेआता ती तशी नसली तरी.

सर्वसामान्यांसाठी आगगाडी हे प्रवासाचं साधन. स्टेशन आणि त्यावरचे प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला हवी ती गाडी पकडण्याची जागा. आगगाडीचा प्रवास एकवेळ आपण एन्जॉय करतोमात्र प्लॅटफॉर्म कधी एकदा सोडतोय असं आपल्याला होतं. गाडीत डबे झाडून पैसे मागणारी मुलं अनेकांना अस्वस्थ करतात. नाईलाज म्हणून काहीजण दुर्लक्ष करतातकाहीजण पैसे काढून देतात तर काहीजण त्यांना हाकलून देतात.

अनेक कारणांमुळे घर सोडून बाहेर पडलेली ही मुलं प्लॅटफॉर्मचा आधार शोधतात आणि स्टेशनच्या चक्रव्यूहात अडकतात. कधीच इष्टस्थळी पोचू न शकणाऱ्या या मुलांचं आयुष्य तिथेच गोलगोल फिरत रहातं. हे वास्तव चपखलपणे दर्शवणारं अमिता नायडूचं 'प्लॅटफॉर्म नं. झीरोहे पुस्तक. काही कारणामुळे निराधार झाल्याने स्टेशनचा आसरा घेणारी मुलं, पांढरपेशा समाजाकडून – पोलिसांकडून होणारा छळत्यातूनही जगण्याची धडपड पण बहुतेकदा उपेक्षेच्या अंधारात हरवून जाणारं त्यांचं आयुष्य. प्लॅटफॉर्मवरचं त्यांचं वास्तव्य आणि वास्तव सांगणाऱ्या, विलक्षण अस्वस्थ करून सोडणाऱ्या काही मुलांच्या कहाण्या या पुस्तकात आहेत. त्यांच्यातली दुष्मनीनवीन मुलांना सांभाळून घ्यायची वृत्तीपाच-सात वर्षाच्या मुलांना मोठ्या मुलांनी दिलेली मायात्यांचे कष्टपौगंडावस्थेत निर्माण होणारे प्रश्नसमाजाने केलेला त्यांचा वापर.... त्यांच्या उपेक्षित जिण्याच्या या साऱ्या पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचं काही बरं करायची कळकळ आणि त्यातून काही काळ केलेल्या कामाच्या अनुभवातून हे पुस्तक उभं राहिलं आहेहे विशेष. ते मुळातून वाचायला हवं.

मन विषण्ण होतं ते या मुलांची यातून सुटकाच नाही की कायह्या निराश भीतीने. जगण्याच्या चटक्यांमधून ही मुलं करकरीत वास्तवाचात्यापासून कसं सुटता येईल याचा विचार करतात. प्लॅटफॉर्म नं. पावणेदहाबद्दल त्यांना विचारलं तर ती काय म्हणतील? "क्या येडा बनते क्या, ऐसा नंबर कैसे होंगा?"  किंवा असंच काही.
पण प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा आहे की नाहीहा प्रश्नच मुळी गौण आहे. खरा प्रश्न आहे प्लॅटफॉर्म नं. पावणेदहाच्या दुनियेत रंगू शकणारं बालपण ह्या व्यवस्थेत त्यांना मिळेल का?

6 comments:

  1. अशा विषण्ण करणा-या कितीतरी गोष्टी सभोवताली असतात .. त्या संपतच नाहीत!
    माझ्यासाठी एक प्रत घेऊन ठेवावी .. पुण्यात आले की घेईन.

    ReplyDelete
  2. वा लगेच comment बघून बरं वाटलं. एक प्रत निश्चितच घेऊन ठेवीन.

    ReplyDelete
  3. Preeti, Thanks!aatach ha navin post vachla. Mast! tujhe aadhiche pan post vachle hote aani avadale pan hote. ha khoop avadala. majhya pustakavar lihilay mhanun nahi tar vilkshan sanvedanshiltene lihilayes mhanun, Harry Potter chya jaduee duniyeshi ghatleli tyachi sangad tar keval apratim! Mala ya pustakatun jo message dyayacha hota toh tujhya shevtachya vakyat achukpane alay. Thanks Dear!

    ReplyDelete
  4. अमिता, तू वाचून comment दिल्यामुळे छान वाटलं. गेल्या आठवड्यात प्लॅटफॉर्म नं. झीरोचं सविस्तर परीक्षण (बहुधा लोकसत्ता) वाचून बरं वाटलं.

    ReplyDelete
  5. प्रीती, छान लिहिलं आहेस. आणि त्यानिमित्ताने या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! समाजात अशा ठिकाणी मुलांचे बालपण खुडून टाकण्याच्या व्यवस्था असतात. अगदी घरात राहणारी मुलंही याला अपवाद नसतात - विशेषतः मुली. अशा मुलांना पाहणं, त्यांच्याबद्दल वाचणं, ऐकणं काळजाला चरचरीत चटका देऊन जातं.

    ReplyDelete