Finally god had died due to cardiac arrest disqualifying his own prophecy.
सत्य साईंचं एक चित्र जे त्यांच्या मृत्यूनंतर ठळकपणे दिसलं;
लाखो भाविक, त्यांची अपरंपार श्रद्धा, अनेकांच्या तोंडून त्यांच्या कृपेच्या अनुभवाचे वर्णन, साईंनी आपले कल्याण केले-योग्य मार्ग दाखवला अशी अनेक सामान्य भाविकांची भावना, दर्शनासाठी सामान्य भाविकांची अलोट गर्दी. लोककल्याणासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.
VIPs चे तर ते खास गुरु. अनेक राजकारणी, खेळाडू, film stars त्यांचे भक्त होते. सचिनला अश्रू ढाळताना तर आपण पहिलंच. बहुतेक राजकारणी नेतेही तिथे उपस्थित होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीही दर्शनासाठी गेले होते. सरकारी इतमामात साईंवर अंत्यसंस्कार झाले.
दुसरं चित्र काय होतं?
सत्य साईबाबांवर अनेक आरोप झाले. कोणताही जादूगार करतो त्या पद्धतीने हवेतून सोनसाखळ्या काढणे, HMT घड्याळे काढणे वगैरे उद्योग ते करत. HMT घड्याळे त्यांनी लवकरच बंद गेली, (बहुधा त्यावरील manufacturing date मुळे) त्यांना याबाबतीत अनेकांनी आव्हान दिलं होतं. त्यांच्या tricks दाखवणाऱ्या films ही उपलब्ध आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, आश्रमातील एका खुनानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण याची चौकशी एका मर्यादेनंतर झाली नाही असं म्हणतात. त्यांच्या high profile राजकारणी भक्तांनी ती व्यवस्था केली असावी असंही बोललं जातं.
९६ वर्षे आपण जिवंत राहणार ही त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नाही. ‘देव’ असूनही त्यांच्यावर लौकिक जगातले उपचार करावे लागलेच, ज्याला त्यांच्या शरीरानी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या भविष्यवाणीनुसार ते २०२२ ला हा देह ठेवणार होते आणि २०२३ ला त्यांच्याच एका सहकाऱ्याच्या पोटी जन्म घेणार होते.(??)
आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांच्या trust कडे असलेल्या अलोट संपत्तीचा. शिर्डीचे साईबाबा फकीर होते आणि तसेच राहिले. मात्र त्यांचा अवतार म्हणवणारे सत्यसाई सोन्याच्या सिंहासनावर बसत होते.
दुसऱ्या चित्राच्या अशा अजून अनेक छटा आहेत.
एकाच माणसाच्या या दोन चित्रांची सांगड मला घालता येत नाहीये.
preeti,
ReplyDeleteClass photo,
surekh virodhabhas dakhawalas.
Aayushya hech virodhabhas ahe ka ?
Alka
एकाच माणसाच्या या दोन चित्रांची सांगड मला घालता येत नाहीये
ReplyDeletetrue....
याचे कारण मृत्यू ही संकल्पना काय आहे याचा आपण विचार केलेला नाही.
ReplyDeletekup chan dhoni pan baju mandalya ahet.great photo.kharya gosticha prachar harnachya gatine lok kartat aani khotya gosticha prachar lok mungichya gatine kartat mahanun he sadhu lok aaplai poli chan bhajun ghetat. v great
ReplyDeleteछान लेख. शेवटी बौद्धिक प्रगल्भता ही माणूस शिकलेला की अडाणी यावर अवलंबून नसते हेच खरे आहे.जादुगार पी.सी . सरकार यांनी या माणसाची ढोंगबाजी उघडकीस आणूनदेखील त्याचे प्रस्थ वाढतच गेले याला कारण या भक्तांची बौद्धिक व मानसिक गुलामगिरी आहे.
ReplyDeleteधन्यवाद अलका, a designer - हे तर विसंगातीचं ढळढळीत उदाहरण झालं. आपल्या आयुष्यातही विसंगती असतात त्याकडे डोळसपणे पाहायला हवं.
ReplyDeleteशरयू, तुमचा मुद्दा मला कळला नाही.
होय मधुकर आणि प्रवीण, बौद्धिक गुलामगिरी आणि त्यामुळे बुवाबाबांनी आपली पोळी भाजून घेण्याची उदाहरणे आपण नित्य पाहतच आहोत.
Sounds Interesting!
ReplyDelete