सध्या माझ्या मनाच्या स्थितीचं वर्णन कंटाळा किंवा साचलेपणा असं करता येईल. रुटीन अपरिहार्य असल्याने ते पार पाडणे या व्यतिरिक्त आपण काही करत नाही ही सततची जाणीव. या रुटीनमध्ये अडकून पडल्याची थोडी भावना आहेच. पण काही वेगळं करायचा उत्साहही वाटत नाहीये. वाचनही जरा सोपं, विरंगुळा या सदरात मोडणारं चाललंय. इंटरनेट वापरत असल्याने अनेक ब्लॉग्स वाचले आहेत. काही दिवसांपासून मनात येतंय, ब्लॉग सुरु करावा का? तर अशा कंटाळलेल्या, किंचित अपराधी मन:स्थितीत ब्लॉगबाबत विचार सुरु झाले.
पुढल्या चिंता म्हणजे लिहायला सुचेल का? कुठल्या विषयांवर लिहायचं? आपण हे नियमित करू का? लिहायला सुचलं नाही तर काय? नियमितता राखता आली नाही तर अपराधी वाटेल का? इ.इ. त्यानंतर मनात येऊ लागले तांत्रिक बाबींचे विचार. म्हणजे font कुठला वापरायचा? पण choice कुठे आहे? टायपिंग शिवाजी किंवा तत्सम phonetic font मधेच करता येतं. मराठीत ब्लॉग कसा लिहायचा हे शिकून घ्यायला हवं.
नकळत आपण किती बारकाईने बघत असतो? आणि आपल्याही काही सवयी बनत जातातच की! उदा. माझंच पहा, line spacing single असेल तर ते मला गिचमिड वाटतं आणि डबल किंवा 1.5 असेल तर जागेचा अपव्यय. मला 1.2 किंवा 1.3 spacing ठीक वाटतं. एवढंच नाही तर मोठं document वाचायचं असेल तर मला सोयीचे वाटणारे हे बदल मी करून घेते. काही जण इतके वेगवेगळे fonts वापरतात म्हणजे मोठया documents साठी, की नवल वाटतं, courier, Comic Sans MS, Arial Rounded MT Bold वगैरे. आणि Serif / Sans Serif fonts बद्दल लोक काय विचार करतात?
हे सारे पाहता आपण पुढील काळात एखादयाचं हस्ताक्षर font वरून ओळखणार की काय? एक गंमत सांगू. माझ्या आधीच्या एका कामाच्या ठिकाणी एक दोन खडूस सह(?)कारी होते आणि ते जरा वेगळे fonts वापरायचे. वेगळेपणा म्हणून नाही तर इतरांना वाचायला त्रास म्हणून अशी आमच्या कंपूची खात्री होती. हे म्हणजे computer using habits वरून एखादया माणसाविषयी खूणगाठ बांधल्यासारखेच झाले की!
तर मूळ मुद्दा होता की माणसं fonts कशी निवडत असतील? Handwriting Analysis सारखा font analysis करतात का? कारण fonts कुणाच्या तरी सुलेखानातूनच निर्माण झाले ना? आज नसेल होत असा analysis तर उदया होईलही असं तंत्र विकसित. (कुणाला माहीत असल्यास माझ्या ज्ञानात भर टाकावी) त्यावरून कळेल का स्वभाव वगैरे? ते तर font जिने/ज्याने शोधले तिला/त्याला लागू होईल. पण तो font वापरणाऱ्या माणसांच्या स्वभावात काही साम्यस्थळे असतीलच की!
अरेच्या, गाडी भरकटलीच की काय माझी? पण बघा, काय लिहावे म्हणता म्हणता, जवळ जवळ दोन पानं (computer चं A 4 page हं) लिहून झाली की! म्हणजे लिहिणं खूप अवघड नाही तर, फक्त वाचणारे हवेत.
ता. क. मराठी ब्लॉग लिहिण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी मी शिकलेय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल
Wah Tai Chan, asech changle lihi! Babana pan sangen.
ReplyDeleteblog khup chan aahe. me vachat jain.
ReplyDeleteFont selection is also a matter of what has been taught to us.. many choose Times New Roman, just because they have been taught so. Stereotypes exist in this field too.
ReplyDeleteGood beginning, Keep it up.
प्रीतीताई,
ReplyDeleteब्लॉग एकदम चांगला जमलाय. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाचणारे पाहिजेत. ब्लॉग लिहिणारे सध्या बक्कळ झालेत पण नियमीत वाचक मात्र फार कमी असतात असा माझा अनुभव आहे. परंतु लेखन प्रसिध्द करण्यासाठी कुण्या खडूस प्रकाशकावर अवलंबून रहावे लागत नाही ब्लॉगमुळे. आपले विचार सहज व्यक्त करता येतात आणि चांगल्या वाचकांपर्यंत सहज पोहचवताही येतात.
शुभेच्छा!
Preeti, chhan lihilays. mi fonts chya babatit pharashi bothered nasate. pan i think ata tyachi suruvat hoil.
ReplyDeleteKahitari lihayacha prayatna kartye sadhya. kahi jan khup mage lagalet ki lihi mhanun. ani majha nehamipramane ki mala nahi yet lihita. pan sadhya prayatna chalalay. Aani agadi ajachich goshta. lihinyapeksha shivaji mahdye type karava ka ha vichar aala hota, pan lihayachach asa tharavala. majha akshar tujhyaitaka changala nahi, pan ekekali tujha akshar baghunach jara bara lihayacha prayatna suru kela.
anyway. majha puran bas. pan sangayacha mhanje blog jarur direct type kar. pan lihit raha.
Thank you Swapnagandha and Sai for your compliments.
ReplyDeleteThank you for your precise feedback Savita, Yes I am talking about Stereotypes, moreover ourselves getting stereotyped in the process.
Thank you Sachin, yes I look forward for good readers that means responsibility of writing that would make sense.
Hey Renuka, good that you are writting, I'm sure you have so much to share. By the way thanks for your feedback especially for my akshar
priy preeti
ReplyDeleteNamaskar
kal mi tunchya sandehas uttar denyacha prayatn kela pan fasala. aaj pahu yat. Mala tumcha sandesh awadala.
Dhanywad
Anvar
Hi Preeti, Khoop chhan ahe blog!! Vicharat padanyasarakha.. inglish madhe type karayla avadat nahiye.. pan cyber madhe vicharala nahi mee maathi font ahe ka te.. lavkarach marathit lihayla suruvat karin me.. chhanach! .lihit jaa.. thank you very much!!
ReplyDeleteDear, You have analysed very minute things writing Marathi blog and fonts!!!
ReplyDeleteNice and interesting Blog.
Keep writing.
Thank you Veena for finding time to read from your busy schedule and compliment.
ReplyDeleteThanks Deepa for your encouraging feedback.
Many more things to write; readers reflecting on it gives strength to write further
priya preeti, tulaa naahi vaatat pratyekane comment marathitunach lihilee paahije... tu sudhha. kharach marathi font varun swabhav kalu shakataata... khup sunder nirikshan... preeti tarangsathee khup khup shubhecha :)
ReplyDeleteHi Preeti,
ReplyDeleteAaj office chya mail warun kalal ki tu mazya mail id war mail sent kelis mhanun utsuktene blog wachala.mala tuze likhan nehmeech awadte.Pan tuzi blogchi sashankata wachun surprise watale.u can easily do it.
Alka potnis
हो मनीषा, मराठी comment ला तरी मी मराठीतून लिहायला हवं पण सगळ्यांनी मराठीतूनच म्हणजे देवनागरीतून लिहायला पाहिजे असं नाही. कारण त्यात तांत्रिक बाबी येतात. महत्वाचं काय तर व्यक्त होणं, असं नाही तुला वाटत?
ReplyDeletethank you अलकाताई, तुमच्याकडून critical comments आलेल्या आवडतील हं मला.
प्रीती, font चा psycho analysis ही कल्पना अफलातून आणि कालसुसंगतही आहे. खरोखर अलिकडे आपण संगणकीय लेखनातूनच व्यक्त होतो. तुझे पोस्ट वाचत असताना एक गंमतशीर शंका मनात आली..हस्ताक्षर सहसा बदलत नाही त्यामुळे त्याचे विश्लेषण करणेही त्यामानाने सोपे असते. पण लेखनाच्या प्रकारानुसार एकच व्यक्ती निरनिराळे fonts वापरु शकते. त्यामुळे त्याचे विश्लेषण हा प्रकारही अधिक अवघड आणि गुंतागुंतीचा असणार.
ReplyDeleteखरच हे पोस्ट एखाद्या graphology वाल्याला वाचायला द्यायला हवे. कुणी सांगावे कदाचित font च्या graphology चा उदय होईलही....