ऑक्टोबर २०१७ मध्ये मीटू हा हॅशटॅग व्हायरल झाला. लाखो
महिलांनी हा हॅशटॅग वापरून लैंगिक छळाचे अनुभव सोशल मिडियावर मांडले. यावर अनेक आक्षेपही घेण्यात आले. या महिला इतक्या
वर्षांनी का बोलत आहेत?
कशावरून त्या खरं सांगत आहेत? ज्यांच्या
हातात सोशल मीडिया आहे त्या व्यक्त झाल्या, पण
कष्टकरी महिलांचे काय? इ. इ. खरे
तर लैंगिक छळाच्या मुद्द्यावर महिला अनेक वर्षे आवाज उठवत आहेत. मीटू मध्ये आरोप
झालेल्यापैकी बहुतेक घटना या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या आहेत. याच्या
प्रतिबंधासाठी भारतात विशाखा मार्गदर्शक तत्वे आणि नंतर त्यावर कायदा आला. भँवरी
देवी ही सर्वसामान्य ग्रामीण महिला, तिच्यावरच्या लैंगिक अत्याचाराबाबत ठामपणे उभी
राहिल्याने हे शक्य झाले आहे. आता मीटू एवढे व्हायरल का झाले, याचा धांडोळा घेताना
अनेक कारणे लक्षात आली. 
Everyday Sexism: रोजच्या आयुष्यात दिसणार्या
लिंगभेदाबाबत स्त्रियांनी बोलते व्हावे म्हणून लॉरा बेट्स यांनी एप्रिल २०१५ मध्ये
हा हॅशटॅग सुरु केला. त्याचा वापर करून अनेकींनी आपले अनुभव मांडले. या संभाषणातून
लिंगभेदाबाबतीतली चर्चा विस्तारली आणि अगदी सूक्ष्म पक्षपाती वर्तनापर्यंतचे
मुद्दे विचारात आले. यापूर्वीच २०१३ मध्ये Every Day Sexism Project आणि Women, Action and Media या संस्थेने फेसबुकवरील स्त्रीविरोधी पोस्ट्स, पेजेस याविरोधात online campaign उभं केलं. फेसबुकला पाठवलेल्या अनावृत्त पत्रात त्यांनी स्त्रियांवरच्या अत्याचाराला, बलात्काराला चिथावणी देणार्या काही पेजेसचा उल्लेख
केला होता, फेसबुकने असा आशय तपासण्याची मागणी
करण्यात आली. या पाठपुराव्याचा परिणाम होऊन फेसबुकने अशा पेजेसवर कारवाई केली आणि
आपली व्यवस्था Sexist Hate Speech ओळखण्यात
कमी पडल्याचे मान्य केले. Controversial, Harmful and Hateful Speech on
Facebook संदर्भातले फेसबुकचे निवेदन फेसबुकवर
उपलब्ध आहे.
Questions for men – ‘या बाईला काही करून लक्ष
वेधून घ्यायचं असतं’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन
लेखिका क्लेमेंटाइन फोर्ड हिला  एका लेखावर
मिळाल्या. यावर तिने पुरुषांना प्रश्न ट्वीट केला, “जर
तुम्ही इतरांना विवाद्य वाटणारा मुद्दा मांडला तर तुम्हाला ‘attention seeker’ असं म्हटलं जातं का?” यावर
भराभर आलेल्या प्रतिक्रियांतून #Questionsformen या नवीन हॅशटॅगची सुरुवात
झाली. जगभरातील स्त्रियांनी हा हॅशटॅग वापरून त्यांना येणार्या भेदभाव आणि लैंगिक
छळाच्या अनुभवांबद्दल पुरुषांसाठी प्रश्न उपस्थित केले. उदा. तुम्हाला कामाच्या
ठिकाणी ‘हनी’, ‘स्वीटी’ असं कुणी म्हणतं का? जॉब
इंटरव्ह्यूमध्ये घरची जबाबदारी आणि काम याचा ताळमेळ कसा राखणार हे कुणी पुरुषांना
विचारतं का? इ.
असे अजूनही काही हॅशटॅग
मीटू च्या पूर्वी वापरले गेलेले दिसतात, ज्यामुळे लिंगभावाविषयक अनेक महत्वाचे
मुद्दे सोशल मीडियात चर्चिले गेले. #MeToo चा एक महत्वाचा परिणाम म्हणजे
अनेकींना त्यातून धाडस मिळालं आणि त्या लैंगिक छळाच्या अनुभवाबद्दल लिहू लागल्या.
एमिली जॉय हिने ट्वीटरवर आपली कहाणी मांडली. दहा वर्षापूर्वी चर्चमध्ये झालेल्या
लैंगिक शोषणाबद्दल तिने लिहिले आणि यातून #ChurchToo सुरु झाला. 
[1]
ढोबळमानाने असं मानलं जातं की मतदानाच्या हक्कासाठी
स्त्रियांनी केलेली चळवळ ही पहिली लाट, १९२० साली हा हक्क मिळाला. त्यानंतर १९६०
पासून दुसरी लाट ज्यामध्ये स्त्रियांच्या हक्कांबाबत अनेक आंदोलने झाली, स्त्रीवादी सिद्धांकन जोरकसपणे पुढे आले. १९९१ मध्ये अमेरिकन
सुप्रीम कोर्ट जजसाठी नामांकन झालेल्या क्लेरन्स थॉमस
यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले, त्यातून जे आंदोलन उभं राहिलं त्यातून
तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याचं मानलं जातं.
Everyday Sexism: रोजच्या आयुष्यात दिसणार्या लिंगभेदाबाबत स्त्रियांनी बोलते व्हावे म्हणून लॉरा बेट्स यांनी एप्रिल २०१५ मध्ये हा हॅशटॅग सुरु केला. त्याचा वापर करून अनेकींनी आपले अनुभव मांडले. या संभाषणातून लिंगभेदाबाबतीतली चर्चा विस्तारली आणि अगदी सूक्ष्म पक्षपाती वर्तनापर्यंतचे मुद्दे विचारात आले. यापूर्वीच २०१३ मध्ये Every Day Sexism Project आणि Women, Action and Media या संस्थेने फेसबुकवरील स्त्रीविरोधी पोस्ट्स, पेजेस याविरोधात online campaign उभं केलं. फेसबुकला पाठवलेल्या अनावृत्त पत्रात त्यांनी स्त्रियांवरच्या अत्याचाराला, बलात्काराला चिथावणी देणार्या काही पेजेसचा उल्लेख केला होता, फेसबुकने असा आशय तपासण्याची मागणी करण्यात आली. या पाठपुराव्याचा परिणाम होऊन फेसबुकने अशा पेजेसवर कारवाई केली आणि आपली व्यवस्था Sexist Hate Speech ओळखण्यात कमी पडल्याचे मान्य केले. Controversial, Harmful and Hateful Speech on Facebook संदर्भातले फेसबुकचे निवेदन फेसबुकवर उपलब्ध आहे.
Questions for men – ‘या बाईला काही करून लक्ष वेधून घ्यायचं असतं’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन लेखिका क्लेमेंटाइन फोर्ड हिला एका लेखावर मिळाल्या. यावर तिने पुरुषांना प्रश्न ट्वीट केला, “जर तुम्ही इतरांना विवाद्य वाटणारा मुद्दा मांडला तर तुम्हाला ‘attention seeker’ असं म्हटलं जातं का?” यावर भराभर आलेल्या प्रतिक्रियांतून #Questionsformen या नवीन हॅशटॅगची सुरुवात झाली. जगभरातील स्त्रियांनी हा हॅशटॅग वापरून त्यांना येणार्या भेदभाव आणि लैंगिक छळाच्या अनुभवांबद्दल पुरुषांसाठी प्रश्न उपस्थित केले. उदा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी ‘हनी’, ‘स्वीटी’ असं कुणी म्हणतं का? जॉब इंटरव्ह्यूमध्ये घरची जबाबदारी आणि काम याचा ताळमेळ कसा राखणार हे कुणी पुरुषांना विचारतं का? इ.
[1]
ढोबळमानाने असं मानलं जातं की मतदानाच्या हक्कासाठी
स्त्रियांनी केलेली चळवळ ही पहिली लाट, १९२० साली हा हक्क मिळाला. त्यानंतर १९६०
पासून दुसरी लाट ज्यामध्ये स्त्रियांच्या हक्कांबाबत अनेक आंदोलने झाली, स्त्रीवादी सिद्धांकन जोरकसपणे पुढे आले. १९९१ मध्ये अमेरिकन
सुप्रीम कोर्ट जजसाठी नामांकन झालेल्या क्लेरन्स थॉमस
यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले, त्यातून जे आंदोलन उभं राहिलं त्यातून
तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याचं मानलं जातं.
 
 
No comments:
Post a Comment